निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा: डॉ. अमोल कोल्हे

पुणे, दि.४ जून २०२०: पिंपरी चिंचवड शहराला दोन दिवसात झालेल्या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यात नागरिकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काहींच्या घरातही पाणी शिरल्याचे प्रकार घडले आहेत. या निसर्ग चक्रीवादळामुळे विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण सह पुण्यातही मोठ्या प्रमाणात बसल्याचे पहायला मिळते आहे. बुधवारी दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्पर उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा