न्यूज अनकट’ च्या बातमीचा इम्पॅक्ट, अखेर निरा उजव्या कालव्याला आले पाणी

फलटण, सातारा २७ जुलै २०२३ : सहा दिवसांपूर्वी म्हणजेच २१जुलै रोजी ‘न्यूज अनकट चॅनेल’ ने धरण परिसरात समाधानकारक पाऊस असल्याने वीर धरणातून निरा उजवा कॅनाल ला पाणी सोडण्याचे वृत्त प्रसारित केले होते. कारण फलटण तालुक्यातील दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या बळीराजाच्या शेतीसाठी पाण्याची गरज आहे. न्युज अनकटचे ते वृत्त खरे ठरले असून या बातमीच्या इम्पॅक्ट ने आज फलटणच्या निरा उजव्या कालव्याला पाणी आले आहे.

फलटण तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. तालुक्यात गेली दोन दिवस रिमझिम पाऊस होतोय परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. सध्या शेतकऱ्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उसाच्या लागणी सुरू करायच्या असल्याने त्यासाठी भरपूर पाणी लागते. या भागात अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने व ढगाळ वातावरण असल्याने विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पाणी प्रश्नाची टंचाई जाणवत आहे.

या प्रश्नाची गंभीर दखल घेत न्यूज अनकट ने हा प्रश्न लावून धरला आणि आज अखेर संबंधित यंत्रणेने या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता निरा उजवा कॅनलला पाणी सोडले आहे.

सध्या या भागात ऊस, मका, कडवळ अशी पिके घेतली जातात. वेळेत पाऊस न पडल्याने यावर्षी बाजरीचे पीक शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला मिळणार नाही, परंतु कॅनलला पाणी आल्याने मोठा दिलासा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची तात्पुरती सोय होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा