कामशेत, २७ जुलै २०२३ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाणे मावळ परिसरातील वडिवळे धरण ८५ टक्के भरले असून, धरणातून आंद्रा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाणे मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने वडिवळे धरण सुमारे ८५.३५ टक्के भरले आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन ३३८ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वडिवळे, गोवित्री, कांब्रे, उकसान, नाणे, करंजगाव वाड्यांनाही या धरणातील पाण्याचा फायदा होत असतो. धरणसाठ्यात वाढ झाल्याने नाणे मावळातील अनेक वाड्या-वस्तांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख अभियंता संतोष शिंदे यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर











































