कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान गरिबांचे, ‘न्याय’ योजना लागू करा: राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. ३० जून २०२०: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना आणि अर्थव्यवस्थेबाबत सूचना दिल्या. राहुल म्हणाले की कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. राहुल म्हणाले की त्यांच्यासाठी सरकारने न्याय योजनेसारखी योजना आणली. जी फार दीर्घकाळासाठी नसावी, ६ महिन्यांसाठी असेल. त्याअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रुपये जमा करावेत. यामुळे मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येईल, असे राहुल म्हणाले.

मात्र, सरकारने तीन-चार वेळा यास नकार दिला आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की मी हे मान्य करतो की सरकारकडे पैसे नाहीत परंतु हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की सरकारने १५ मोठ्या उद्योगपतींचा लाखो करोडो रुपयांचा कर माफ केला आहे.

चिनी आयातीच्या मुद्यावर राहुल यांनी सरकारला घेरले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनकडून आयातीच्या मुद्द्यावरून सरकारला घेराव घातला आहे. ते मंगळवारी म्हणाले की, भाजप मेक इन इंडिया बोलतो, पण चीनकडून वस्तू खरेदी करतो. राहुल यांनी ट्विटरवर दोन आलेख सामायिक केले आहेत, ज्यात मनमोहन आणि मोदी सरकारच्या काळात चीनकडून किती टक्के आयात होते ते दाखवले आहे. हे आलेख दाखवत राहुल गांधी म्हणाले की ही आकडेवारी खोटी नाही.

चीनच्या घुसखोरीवरही मोदींवर सवाल

मेक इन इंडिया मोहिमेमध्ये यापूर्वीही राहुल यांनी सरकारवर हल्ला केला होता. त्यांनी या मोहिमेला अपयशी म्हंटले होते. चीनच्या मुद्यावर राहुल मोदी सरकारविरूद्ध सातत्याने निवेदने देत आहेत. पंतप्रधानांनी सैन्याऐवजी चीनला पाठिंबा दर्शविला आहे असा आरोप त्यांनी केला. चीन भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करून गेला आणि या गोष्टीला भाजप नकार देत आहे तसेच नरेंद्र मोदी सुद्धा चीनच्या या वक्तव्याला समर्थन देत आहेत की चीन भारतीय हद्दीच्या आत मध्ये आलाच नव्हता.

सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी जे वक्तव्य केले त्या संदर्भात राहुल यांनी हे सांगितले की, मोदी म्हणाले होते की, “कोणीही आमच्या हद्दीत प्रवेश केला नाही किंवा आमची कोणतीही पोस्ट कोणाच्या ताब्यात आली नाही.” हे विधान मुद्दा बनवताना काँग्रेसने म्हटले आहे की, जर असे असेल तर चीनशी चर्चा का चालू आहे? या प्रश्ना नंतर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण जारी केले. ते म्हणाले की, मोदींचे वक्तव्य १५ जून रोजी गलवान मध्ये झालेल्या चकमकींविषयी आहे. त्याचा अर्थ असा होता की त्या दिवशी आपल्या सैन्याने चीनचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न विफल केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा