माढा, २२ डिसेंबर २०२०: राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे चार टप्पे झाले असून यामधून एवढे शिक्षक बदलीने स्वजिल्ह्रात आले आहेत. शुन्य बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबविल्यास मोठ्या प्रमाणात बदल्या होऊन आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा शुन्य बिंदूनामावलीनुसार राबवावा ही मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली. त्याबाबतचे निवेदन ग्रामविकास सचिव यांना दिले असल्याची माहिती राजाध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिली आहे.
कोकणासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील बदलीसाठीची १० टक्केची अट रद्द करावी तसेच आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन शिक्षक भरती करण्यात येऊ नये. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना अगोदर सामावून घ्यावे. कोकणासह कार्यमुक्ती राहिलेल्या शिक्षकांची तात्काळ करण्याचे आदेश संबंधित जि.प.ला देण्याची मागणी करण्यात आल्याचे राज्य उपाध्यक्ष निलेश
देशमुख यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील