ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायाल्यात महत्वाची सुनावणी

नवी मुंबई,१९ ऑक्टोबर २०२२: मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद आणि राज्यातील ९२ नगर पालिकेत प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायाल्यात महत्वाची सुनावणी घेतली जाणार आहे.

या सुनावणीदरम्यान २८ सप्टेंबरला झालेल्या गेल्या सुनावणीत नव्यानं दाखल झालेल्या याचिका संदर्भात राज्य सरकारला कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्याकडून सर्वोच्च न्यायाल्यात दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

ठाकरे सरकारने २०२१ ला कोरोनामुळे जनगणना न झाल्याने गेल्या जनगणनेच्या आधारावर मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ वरुन २३६ केली होती. २०१२ ते २०१७ च्या महापालिकेच्या निवडणूकांमध्ये सदस्य संख्येत कोणतेही बदल न करता पार पडल्या होत्या, म्हणून ठाकरे सरकारने २०११ च्या जनगणना नुसर सदस्य संख्येत बदल केला होता.

तर दुसरीकडे राज्यात नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी कायदा करत पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्या २३६ वरुन २२७ केली होती, या दोन्ही प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायाल्याचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा