गोल पोस्ट इतर ‘त्या’ व्हायरल क्लिपमुळे इम्रान खान पुन्हा अडचणीत

‘त्या’ व्हायरल क्लिपमुळे इम्रान खान पुन्हा अडचणीत

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२२ : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. त्यातच आता त्यांच्या एका व्हायरल क्लिपमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. इम्रान खान यांची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत असून ज्यामध्ये ते महिलेसोबत अश्लिल संभाषण करत असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत अश्लिल संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने इम्रान खान चांगलेच वादात सापडले आहेत. पाकिस्तानधील सय्यद अली हैदर या पत्रकाराने त्यांची ही अश्लिल ऑडिओ क्लिप थेट युट्यूबवर अपलोड केली आहे. हा रेकॉर्डिंग केलेला कॉल पंतप्रधान कार्यालयातून केला असून त्यामधील महिला त्यांच्याच पक्षाची मंत्री असल्याचाही दावा केला गेला आहे.

  • पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप!

ही ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर इम्रान खान यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानी महिला पत्रकार नाइला इनायत यांनी ट्विट करत ‘इम्रान खान आता इम्रान हाश्मी झाले आहेत’, अशी टिका केली आहे.

  • ही क्लिप बनावट

या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये इम्रान खान अत्यंत अश्लिल भाषेत महिलेशी संभाषण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल क्लिपनंतर इम्रान खान यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत असून ही क्लिप बनावट असल्याचे इम्रान खान यांनी म्हणले आहे. याबद्दल इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने खुलासा करताना या क्लिपच्या माध्यमातून विरोधक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणले आहे.

दरम्यान, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वादात सापडण्याची इम्रान खान यांची पहिली वेळ नाही. याआधीही त्यांची संसदेतील खासदारांना विकत घेण्याची चर्चा करतानाची क्लिप व्हायरल झाली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version