पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याच्या च्या अतिरिक्त हप्त्याला राज्यसरकारकडून स्थगिती

मुंबई.दि. २३ एप्रिल २०२०:                                                                                                      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याच्या अतिरिक्त हप्त्याला आज स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
१ जानेवारी २०२० पासूनची जाहीर करण्यात आलेल्या महागाई भात्त्याच्या रक्कमेचा हप्ता सोबतच १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ च्या अ‍तिरिक्त महागाई भत्ता आणि डीआरच्या रक्कमेला देखील स्थगिती देण्यात आली आहे. मात्र कर्मचारी आणि पेंशनधारकांना सध्याच्या महागाई भत्त्याच्या टक्क्यांनुसार त्यांचे पैसे दिले जातील अशी माहितीही देण्यात आली आहे.
३१ मार्च २०२० मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्या मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली होती.
मात्र ही वाढ कर्मचार्‍यांसह पेंशन धारकांना १ जानेवारी २०२० पासून लागू होणे अपेक्षित होते.
मात्र, आता हा वाढीव भत्ता देण्याला सरकारने स्थगिती दर्शवली आहे. सरकारी कर्मचार्‍यांना वर्षभरातील महागाईचा दर पाहता जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ करून दिली जाते. मात्र यंदा पुढील आदेशापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा