गोल पोस्ट महाराष्ट्र अकोल्यात “पाणी पिलं की दोन्ही किडण्या होतायत फेल”; जाणून घ्या नेमक प्रकरणं...

अकोल्यात “पाणी पिलं की दोन्ही किडण्या होतायत फेल”; जाणून घ्या नेमक प्रकरणं काय ?

In Akola,
अकोल्यात "पाणी पिलं की दोन्ही किडण्या होतायत फेल

kidney disease in Akola District: पाणी हा मानवाच्या जीवनातला महत्वाचा आनि अविभाज्य घटक मनाला जातो. मात्र, अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पाणीच लोकांच्या जिवावर बेतलं आहे. पाणी पिलं की किडनी फेल होते. मतदार संघातील ६० गावांतील लोकांना किडनीचे आजार झाल्याचे दिसून आले आहेत. ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापुरमध्ये घडली असून या आजारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वाटवरण निर्माण झाले आहे.

सूत्रानुसार अशी माहिती समोर आली आहे की, बाळापुर मतदार संघातील ६० गावांतील लोक विहिर आणि बोअरमधलं पाणी पित आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने स्थानिक नागरीकांना किडनी स्टोन व किडनी संबंधित आजार होत असून काहींची किडनी यामुळे बाद झाली आहे. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सावरपाटी गावात तीन ते चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडणीचा आजार झाला. तर एका राहिवाशाला आपली किडनी गमवावी लागली. एका व्यक्तीला किडनी खराब झाल्याने १२ लाख रुपये उपचारासाठी खर्च आला. उपचारासाठी त्याने आपली शेती विकली तरीही काहीच फायदा झाला नसल्याची माहिती गावातील राहिवाशांनी दिली. अशा परिस्थितीत आजारापासून बचावासाठी व गोड पाणी आण्यासाठी नागरिक १५ ते २० किलोमिटरचा प्रवास दुचाकीवरुण करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

error: Content is protected !!
Exit mobile version