बारामतीत माजी खासदार राजु शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बारामती, २९ ऑगस्ट २०२०:माजी खासदार राजु शेट्टी यांनी काल बारामती मध्ये दुध दर वाढीसाठी मोर्चा काढला होता. यावेळी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर बारामती मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी मोर्चाला बंदी नाकारली असताना जनावरांसह मोर्चा काढल्याने शेट्टी यांच्यासह ११ आयोजक व ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेट्टी यांनी काल दूध दर वाढीसाठी बारामती मध्ये मोर्चा काढला. जमावबंदी कायदा मोडल्याने पोलीस कर्मचारी ओंकार शिताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह साठ कार्यकर्त्यांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात साथीचे रोग प्रतिबंध कायदा अधिनियम, प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण करणे अधिनियम, कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सोशल मीडियावर आंदोलनाची माहिती मिळाल्यावर बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील दुपारी १ वाजता शेट्टी यांनी दोन गाई दोरीने बांधून त्यांना ओढत मोर्चा काढला. प्रशासन भवन येथे मोर्चा पोलिसांनी अडवल्यावर प्रशासन भवन येथे बेकायदा गर्दी जमवत घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी खासदार शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची जोरदार भाषणे झाल्यावर प्रांताधिकारी दादासो कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार देण्यात आल्याचे पोलीस शिपाई शिताप यांनी तक्रारी म्हणाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा