दौंड मध्ये कंत्राटी कामगाराचा पाणी पिताना अचानक जमिनीवर पडून मृत्यू

कुरकुंभ (ता.दौंड), दि. १५ मे २०२०: औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीत एका कंत्राटी कामगाराचा पाणी पिताना अचानक जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केतन विजय लव्हे (वय २५ रा. गोपाळवाडी दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत सिप्ला कंपनीचे अधिकारी स्वप्निल नारायण पवार वय ३३, (रा. पिंपळे गुरव ट्रेझर सोसायटी फ्लॅट नंबर एस २ /४०६ काशीद पार्क पुणे) यांनी दौंड पोलीसात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीत केतन लव्हे हा कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. गुरुवार (दि.१४) दुपारी पावणे दोनच्या दरम्यान केतन पाणी पिण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेला होता. त्याठिकाणी सागर विष्णू गिरमे यांच्याबरोबर बोलत पाणी पिताना केतन हा अचानक जमिनीवर पडला. त्यामुळे त्याला दौंड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र औषधोपचारा पूर्वी केतन मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याबाबत दौंड पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने गोपाळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा