दिल्लीत पोलीस उपनिरीक्षकने दारूच्या नशेत महिलेला चिरडले

नवी दिल्ली, दि. ४ जुलै २०२०: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र यांनी एका महिलेला आपल्या चार चाकी वाहनाखाली चिरडले. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे. योगेंद्र गाडी चालवत असताना नशेमध्ये होता, असे सांगितले जात आहे.

महिलेला धडक देताच त्याने आपली गाडी तेथून काढण्याच्या गडबडीत महिलेला पुन्हा गाडीखाली चिरडले. असे करत त्याने जवळपास २ वेळा महिलेला आपल्या गाडीच्या मागच्या चाकाखाली चिरडले. सध्या या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व तिच्यावर उपचार चालू आहेत.

योगेंद्रला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर भादंवि कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. योगेंद्र ५६ वर्षांचा आहे. आरोपी पोलिस उपनिरीक्षक दिल्ली पोलिसांच्या पीसीआर युनिटमध्ये तैनात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा