इंदापूर मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

इंदापूर, २८ नोव्हेंबर २०२०: क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर शहरातील महात्मा फुले स्मारक या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले महात्मा फुले हे समाजातील श्रमजीवी वर्गांच्या शोषणांची व समाजिक दास्यांची मीमांसा करणारे क्रांतीकारक विचारवंत होते. स्री जातदेखील पुरूष वर्गाच्या दास्यात युगानुयुगे सापडली आहे हे लक्षात घेऊन जोतीरावांनी मुलींसाठी सन १८८४ मध्ये एक शाळा स्थापन केली.

इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, प्रा.अशोक मखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचेे गटनेते गजानन गवळी, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अमर गाडे, स्वप्निल नाना राऊत, मुख्याध्यापक प्रविण धाईजे, विनय मखरे, महात्मा फुले दहीहंडी संघाचे अध्यक्ष गौरव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे वसिम भाई बागवान, बिभीषण लोखंडे, अजय राऊत, युवा नेते प्रशांत मामा उंबरे, इत्यादीं मान्यावर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा