इंदापूर मध्ये झेंडू ने खाल्ला भाव; तब्बल चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विक्री

इंदापूर, २५ ऑक्टोबर २०२०: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा. या सणाला अगोदरच कोरोनाचे ग्रहण आणि त्यातच अतिवृष्टीमुळे गालबोट लागले आहे. इंदापूर तालुक्यांमध्ये बागायती शेतकराचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याचमुळे इंदापूर शहरात दसरा मुहूर्तावर विशेष महत्त्व असलेल्या झेंडू भलताच भाव खाल्ला आहे. तब्बल चारशे ते पाचशे रुपये प्रति किलो दराने झेंडूची विक्री होत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आले असल्याचे पाहावयास मिळाले. परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसली आहे. तसेच आपटा ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव खाल्ला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

सर्वसामान्य नागरिक सध्या एक किलो झेंडू घेतानासुद्धा विचार करताना दिसत असल्याचे चित्र इंदापूर शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे अगोदरच कोरोना, बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या विजयादशमी दसरा या सणावर विर्जन पडल्याचे आज स्पष्ट दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा