इंदापूर, दि. १० मे २०२०: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान व विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी विविध वस्तूंचे वाटप इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन व पत्रकार यांना श्रीमंत ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या यांच्यामार्फत कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत डॉक्टरांना सर्जिकल किट व पी पी ई किट, इंदापूर पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फेस शिल्ट व हॅन्ड सँनीटायझर व सर्व पत्रकार बंधूंना फेस शिल्ट व हॅन्ड ग्लोजचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान व ढोले सर मित्रपरिवार यांच्या माध्यमातून कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम इंदापूर तालुक्यातील ३१ गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी मास्क यांचे वाटप झाले आज आपण कोरोना युद्धातील योद्ध्यांना डॉक्टर, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन व माझे पत्रकार मित्र यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले जे बी बी पी व ढोले सर मित्रपरिवार अशा कठिण प्रसंगांमध्ये सदैव आपल्या सोबत आहे, असे मत जय भवानी गट विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टर अविनाश पानबुडे यांनी ढोले यांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उपक्रम बद्दल कौतुक व्यक्त केले. इंदापूर पोलिस स्टेशन यांच्यावतीने बावडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी अजित कुमार जाधव यांनी या सुप्त उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमास सर्व डॉक्टर सेलचे अध्यक्ष सचिव पत्रकार प्रतिनिधी मधुकर गलांडे, डॉ. महाजन, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. दत्ता गार्डे, डॉ. मिलिंद थोरवे, डॉ. सागर दोशी, डॉ. पोमणे, डॉ. वाघमारे आणि इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्स, पत्रकार आणि पोलीस कर्मचारी संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, जनसंपर्क अधिकारी गणेश पवार फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खेडकर, सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर संतोष खाडे व सूत्रसंचालन प्राध्यापक विपुल वाघमोडे यांनी केले
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे