इंदापूर, दि.७ मे २०२०: बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, ती कारणे म्हणजे या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.
परंतू यंदा संपूर्ण जगासह भारतात सुध्दा कोरोनाचे संकट असल्यामुळे केंद्र शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केल्याने सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. आज जगाला शांततेचा संदेश देणा-या भगवान गौतम बुद्धांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन म्हणजेच बुद्ध पौर्णिमा इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी बौद्ध विहार येथे त्रिशरण पंचशील ग्रहण (प्रार्थना) करुन भगवान गौतम बौद्धांच्या मूर्तीची पुजा करण्यात आली. झेंडावंदन राजश्री घाडगे यांनी केले. यावेळी विजय भोसले, विशाल घाडगे, मधुकर घाडगे ,तुषार भोसले तसेच शंकर घाडगे यांचेकडून उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बांधवांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत भगवान गौतम बुद्धाना वंदन केले.तसेच प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची सर्व बांधवांनी प्रतिज्ञा केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे