इंदापूर तालुक्यात प्रभारी गाव कारभारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार…

इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून तसेच नव्याने १ ग्रामपंचायत स्थापन झालेल्या अशा एकूण ६२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरू   आहेत.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसह नव्याने स्थापन झालेल्या १ ग्रामपंचायतींची मुदत ३१ जुलैअखेर संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्त होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जात आहे.

नवीन नियमानुसार प्रशासक निवडीचे सर्व अधिकार पालकमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पूर्ण अधिकार आहेत. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच इच्छुक असलेल्या गाव कारभाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी यांना प्रशासक नेमता येईल परंतु ६२ ग्रामपंचायतींना केवळ सहा ते सात विस्ताराधिकारी इंदापूर तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे आपणाला गाव कारभारी होण्याची आयतीच संधी मिळू शकते या भावनेने अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे सध्या तालुक्यात चित्र पहावयास मिळत आहे.

त्यामुळे तालुक्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असतानाच दुसरीकडे मात्र अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच ग्रामपंचायतींवर कोणाची वर्णी लागते हे पाहणे देखील औत्युसक्याचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा