भारतात रुग्णांना पुन्हा होतेय कोरोनाची लागण, प्रकृती पहिल्यापेक्षाही गंभीर

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूने बरे झालेल्या मुंबईतील चार आरोग्य कर्मचा-यांवर पुन्हा कोविड -१९ ची लागण झाल्याचे समोर आले आहे . ‘दि लाइनसेट’च्या मेडिकल जर्नल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हे चार रुग्ण मागच्यावेळी या वायरसनं संक्रमित झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची जी स्थिती होती त्यापेक्षाही गंभीर स्थिती या वेळेस पुन्हा कोरोनाची लागण झाल्यानंतर दिसून आलीय.

अहवालानुसार पुन्हा संसर्ग झालेल्या चार रुग्णांपैकी तीन डॉक्टर बीएमसीच्या नायर हॉस्पिटलचे आणि एक हिंदुजा हॉस्पिटलमधील हेल्थकेअर कर्मचारी आहेत. जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (आयसीजीईबी) दिल्ली यांनी दोन रुग्णालयांसह हा अभ्यास केलाय. येथे आठ जीनोममध्ये ३९ म्यूटेशन (उत्परिवर्तन) आढळलं.

 

नायर रुग्णालयाच्या डॉ. जयंती शास्त्री आणि आयसीजीईबीच्या डॉ. सुजाता सुनील यांनी सांगितलं की, चार आरोग्य सेवा कामगारांना दुसर्‍यांदा संसर्ग झालाय. या चौघांना पूर्वीपेक्षा जास्त गंभीर लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे. फ्रंटलाइन हेल्थकेअर कामगार सातत्यानं सार्स-कोव्ह -२ च्या संपर्कात असतात आणि दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

डॉ. सुनील म्हणाले की आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह चाचणी पुन्हा संसर्गाची पुष्टी करू शकत नाही. री-इन्फेक्शन केवळ व्हायरल आयसोलेट्सच्या संपूर्ण जीनोम सीक्वेन्सिंग (डब्ल्यूजीएस) द्वारे शोधलं जाऊ शकतं. कोविड -१९ चा संसर्ग पहिल्यांदा होतो तेव्हा लक्षणं असतात किंवा कोणतीच लक्षणं दिसून देखील येत नाहीत. तर दुसर्‍यांदा संसर्ग झाल्यास रुग्णाची आरोग्य स्थिती गंभीर असते. या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना प्रकृती चिंताजनक झाल्यानं दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

तथापि, दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या चार आरोग्य कर्मचार्‍यांना ‘लोअर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट’ मध्ये श्वसनाची समस्या उद्भवली नाही. कदाचित या कर्मचाऱ्यांचं वय कमी असल्यानं त्यांना हा त्रास जाणवला नसंल. शोधकरत्यांचं ही माहिती समोर आणण्याचं कारण असं होतं की या स्थळा विषयी माहिती लोकांना असणं गरजेचं आहे जेणेकरून ते पुढील संभाव्य धोक्यापासून सावध राहतील.

पुन्हा संसर्गाची प्रकरणं जगभरात पाहिली जातायत. या महिन्याच्या सुरुवातीस हाँगकाँगमध्ये पुन्हा संसर्गाच्या पहिल्या घटनेची पुष्टी झाली. या टीम मधील पुन्हा संक्रमित कर्मचार्‍यांमध्ये डी ६१४ जी म्यूटेशन आढळलं, जे स्पाइक प्रोटीनसाठी ओळखलं जातं जे लोकांना सहज संक्रमित करतात. डी ६१४ जी म्यूटेशन हा लोकांमधील जीवघेणा संसर्गाशी संबंधित आहे. डॉ. सुनील म्हणाले की, चौघांमधील संसर्ग गेल्या वेळेपेक्षा जास्त गंभीर होता.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा