नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकताच्या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. आता भारत देश आज मध्य रात्रीपासून २१ दिवसांसाठी “लॉक डाऊन करण्यात येणार आहे.अशी घोषणा मोदी यांनी केली आहे.
यावेळी मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट परंतु करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
आज संपूर्ण देशात करोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी करोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखेर पंतप्रधानांनी केलेल्या घोषनेनुसार भारत देश आता २१दिवसांसाठी “लॉक डाऊन” करण्यात येणार आहे.