पुणे, दि.७ मे २०२० : सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जण आपापल्या घरामध्ये आहेत. त्यामुळे घरबसल्या आज आपल्याला “सुपरमून” चे दर्शन घेता येणार आहे. या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. त्यामुळे तो अधिक मोठा आणि आकर्षक दिसणार आहे. शिवाय या वर्षातील हि शेवटची सुपरमून पाहण्याची संधी आहे.
आज संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर लगेचच आकाशात पूर्ण तेजाने तळपणारा चंद्र दिसणार आहे. साधारणपणे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास हा पूर्ण मोठा चंद्र पाहता येणार आहे . पुढील वर्षी २७ एप्रिल २०२१ रोजी हा सुपरमून पुन्हा पाहता येणार आहे.
यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. त्यामुळे तो खूप तेजस्वी दिसतो म्हणून त्याला सुपरमून असे म्हणतात. पृथ्वी आणि चंद्राचे नेहमी अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किमी असते. परंतू , या दिवशी हे अंतर थोडे कमी असते. म्हणून या दिवशी चंद्र जास्त प्रकाशमान दिसतो. पृथ्वीवरुन चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. हा सुपरमून पाहण्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. साध्या डोळ्यांनीही तो पाहता येणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर