लोणीकाळभोर, दि.४ मे २०२० : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या हद्दीत मागील चार दिवसांपूर्वी एकूण चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. असे असताना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती मध्ये दोन दिवसांपूर्वी पुण्याहून लोहियानगर परिसरात राहणारी एक (४५ वर्षीय) महिला मागील आठ दिवसापासून आजारी होती. व पुण्यात पुरेसे उपचार न मिळाल्याने ती तिच्या जावयांकडे तीन दिवसापूर्वी रहाण्यास आली होती.
दोन दिवसापूर्वी त्या महिलेच्या छातीत धुखू लागले. त्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे तिच्या रक्ताची तपासणी केली व एक्सरे काढुन पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मात्र त्या रुग्णालयातील उपचार परवडणारे नसल्याने ती ला गोळीबार मैदान (पुणे) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अाले असता तेथील तपासणीत तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे रविवारी (दि.३) रोजी रात्री उशिरा निष्पन्न झाले.
संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न होताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व प्रशासन व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी जाऊन त्या महिलेचे जावई रहात असलेली वस्ती निर्जंतुकीकरण करून घेतली व लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेले दोन जावाई यांना तात्काळ कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्या महिलेच्या संबंधित दोन जावयांसह तब्बल २७ जण आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. उर्वरित २५ जणांना आज पुण्यात नेण्यात येणार आहे. असे डॉ. डी. जे. जाधव. यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे