कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर, ७ मे २०२४ : कोल्हापुरात मतदानासाठी आलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर पेठ इथल्या रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महादेव सुतार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव असून उत्तरेश्वर पेठेतल्या रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर ते मतदानासाठी रांगेत उभा असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच महादेव सुतार यांचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे उत्तरेश्वर पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : श्रीकांत पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा