पत्रकारांच्या वार्षिकोत्सवात गुणवंत पत्रकारांचा सत्कार

नागपूर, ४ मे २०२४ : राज्य सरकारचे माहिती आयुक्तालय आणि पत्रकारांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा नागपूरचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केली आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्या वार्षिक स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.‌

गेल्या वर्षात पुरस्कार-पदे मिळवणारे पत्रकार आणि परीक्षांमध्ये चांगले यश मिळविणारे पत्रकारांचे अपत्य यांचा यावेळी पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‌ महाराष्ट्र दिनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या या स्नेहमिलनात राजेश दुरुगकर यांच्या वाद्यवृंदाने उपस्थित पत्रकार कुटुंबीयांना रिझविले. यात राम भाकरे आणि नरेश डोंगरे या पत्रकारांनी सुद्धा गाणी सादर केली.

पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरीष बोरकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष विश्वास इंदूरकर, विश्वस्त विनोद देशमुख, प्रभाकर दुपारे, गणेश शिरोळे, मनीष सोनी यांच्यासह अनेक पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा