पिंपरी-चिंचवड मध्ये सकाळी ‘वासुदेव’ करतोय मतदान जनजागृती

पुणे २ मे २०२४ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे, यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अ.भा.नाट्य परिषदेच्या वतीने वासुदेवाकडून मतदान जनजागृती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान..’ अस म्हणत अनेक वासुदेव मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड मध्ये सकाळी मतदान जनजागृती करताना दिसतायत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान जनजागृती होत आहे. यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, हे खरेखुरे वासुदेव असून त्यांच्या मार्फत लोकगीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील उद्याने, सोसायट्या आणि विविध भागात सकाळी ६ ते १० या वेळेत ही जनजागृती करण्यात येत आहे.

शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे, आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो? अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा, मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन हे वासुदेव करत आहेत. या मतदान जनजागृती साठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदि बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग, आसाराम कसबे, संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा