लखीमपूर खेरी मध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

युपी, १५ सप्टेंबर २०२२ : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी मध्ये निरासन पोलीस स्टेशन हद्दीतील लालपुर माजरा तमोली पूर्व गावात अनुसूचित जातीच्या दोन अल्पवयीन बहिणीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून कुटुंब आणि ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला आहे. गावापासून काही किलोमीटर अंतरावर निगासण चौकात रास्ता रोको आंदोलने केले आहे. ही घटना घडल्यानंतर अतिरिक्त (SP) अरुण कुमार सिंह यांनी या प्रकरणात चार आरोपी ताब्यात घेतले असून अन्य तीन आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी खून आणि बलात्कार पॉस्को कायदा अंतर्गत FIR दाखल केला आहे.

तसेच पोलीस अधीक्षक एस पी संजीव सुमन पोलीस दलासह आंदोलन स्थळी पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे की आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, तर दुसरीकडे लखनऊचे पोलीस महानिरीक्षक (IG) लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की लखीमपूर मधील एका शेतात दोन मुलीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले असून मृतदेहांवर कोणत्याही जखमा नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अहवालाची प्रतीक्षा करत आहे.

या दरम्यान या प्रकरणावरून लखीमपूर मध्ये वातावरण तापलं आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. ट्विट करत बोलतात की, निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन दलित बहिणींचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्या वडिलांनी पोलिसावर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबीयांच्या संमतीशिवाय मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. लखीमपूर मधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या म्हणजे हाथरस मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा