पेण, १८ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात भाजप पक्ष विरोधात असून सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत, तर मध्यंतरी आमदार आणि नेते मंडळी यांच्या पक्षबदली वर सरकार आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली असतानाच रायगड मध्ये मात्र भाजप पक्षाला तडा गेला आहे.
रायगड जिल्हातील पेण शहरामधे भाजपाला मोठ्या प्रमाणात खिंडार पडली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली विद्यमान ६ नगरसेवक तसेच ५ माजी नगरसेवक यांनी देखील कमळ सोडून मनगटात घड्याळ बांधले आहे. श्रृंगारपुरे यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी पक्षातंर केले आहे.
याच नेत्यांवर बच्चू कडू, राजू शेट्टी या नेत्यांमधे मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठत होती. ज्यामध्ये नवाब मलिक यांनी उडी घेतली होती. तर सरकार आणि विरोधी पक्षात चाललेल्या या संग्रामात पहिली बाजी राष्ट्रवादी पक्षाने मारली आहे, असे दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी