नाशिक, २९ मार्च २०२३: राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा ते नवीन पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे.
शिधावाटपानुसार नांदगाव तालुक्यात देखील आनंदाचा शिध्याची टप्पा टप्प्यात वाटप होत आहे. नांदगाव तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लीटर पामतेलाचा शिधा देण्यात येणार आहे. ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने हा शिधा वितरित करण्यात येत आहे.
लाभार्थी कार्डधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार असून यामध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक लीटर पाम तेल, एक किलो चणाडाळ मिळणार आहे. तालुक्यातील वाटप दुकान संख्या १५६ आहेत. तर तालुक्यातील कार्डधारकांची संख्या ३८८०५ एवढी आहे, असं सांगण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर