नाशिकमध्ये राज्यपालांसह आमदारही आदिवासी नृत्यावर थिरकले

नाशिक, १६ नोव्हेंबर २०२२: विविध कार्यक्रमांमधील भाषण असो वा वक्तव्य यावरुन सतत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा चर्चेत राहीले आहेत. नाशिकमध्ये देखील ते चर्चेत राहीले खरे; मात्र वादग्रस्त विधानावरुन नव्हे, तर आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यामुळं.

त्यांच्या सोबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि विधान परीषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही ठेका धरला होता. आदिवासी विकास विभागातर्फे नाशिक मध्ये चार दिवस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

महोत्सवाच्या उद्धाटनानंतर राज्यातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी कला पथकांनी आपले नृत्य सादरीकरन केलं. चंद्रपूर येथील पथकाचं आदिवासी नृत्य सुरु असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यासपीठावरुन उठत आपल्या सोबत ना. विजयकुमार गावित आणि नरहरी झिरवाळ यांना घेतलं.

राज्यपालांसह मंत्री, आमदार यांच्या नृत्यामुळे महोत्सवात एक वेगळाच रंग भरला. याच ठेक्यात विधान परीषदेचे उपाध्याक्ष नरहरी झिरवळदखील सहभागी झाले होते. झिरवळ हे त्यांच्या पैत्रा आणि आदिवासी नृत्य या दोन्ही प्रकारांसाठी प्रख्यात आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा