एकाच दिवशी कोविड १९ चे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले

मुंबई, दि. १३ मे २०२०: एकाच दिवशी कोविड १९ चे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावावर झाली आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची राज्याला एकप्रकारे भेटच मिळाली आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ठाणे येथील २०९, पुणे १६१, मुंबई ५५, रायगड ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले.

डॉक्टरांचे उपचार, रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यात परिचारिका या महत्त्वाचा दुवा असतात.रुग्णाची शुश्रुषा करुन त्याला बरे करण्यात त्यांचे परिश्रम महत्त्वाचे असतात. कोरोना लढ्यात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन अहोरात्र झटणाऱ्या, हिंमतीने लढणाऱ्या परिचारिकांना राजेश टोपे यांनी सुभेचछा दिल्या.

उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील अभिनंदन केले. समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांना, कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण ११७, लातूर मंडळात एकूण १२, अकोला मंडळात एकूण १०१ तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण ७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा