एका दिवसात मुंबई पोलिसांनी तब्बल ६ हजार ९०० वाहनांवर केली कारवाई

मुंबई, दि. २९ जून २०२०: कोविड -१९ सर्वात जास्त प्रभाव कोठे असेल तर तो मुंबईमध्ये आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील सर्वात जास्त प्रभावित शहर मुंबई आहे. मुंबईमध्ये सातत्याने वाढत असलेल्या प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये असा देखील नियम लागू करण्यात आला आहे की, रहिवासी ठिकाणापासून दोन किलोमीटरच्या बाहेर जर वाहने घेऊन जाणार असेल तर त्यासाठी वैद्य कारण द्यावे लागेल अन्यथा वाहनांवर कारवाई करण्यात येईल.

या कारणास्तव काल मुंबईमध्ये तब्बल ६,९०० वाहनांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच कोणतेही वैद्य कारण नसताना रहिवासी भागापासून दोन किलोमीटर लांब पर्यंत वाहने निष्कारण चालवणे यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.

ऑफिसला जाण्यासाठी व अत्यावश्यक वस्तूंशिवाय घराबाहेर २ कि.मी.पेक्षा अधिक प्रवास करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी रविवारी नवीन निर्देश जाहीर केले होते. खरेदीसाठी, सलूनला भेट देण्यासाठी किंवा व्यायामासाठी सर्व कामे २ किमीच्या परिघामध्ये करावी लागतील. कोविड १९ संक्रमण आणि मृत्यू वाढवूनही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत होते आणि सामाजिक अंतरांच्या निकषांचे पालन करीत नव्हते म्हणून ही घोषणा केली गेली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा