पुणे विभागात ७,५६६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि. ८ जून २०२०: पुणे विभागातील ७ हजार ५६६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले अाहेत परंतू विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२ हजार ४१८ झाली आहे. यामध्ये ॲक्टीव रुग्ण ४ हजार २७५ आहेत. कोरोनाबाधीत एकुण ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४५ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.९३ टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील ९ हजार ६५१ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ६ हजार ५३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार १७८ एवढी आहे. कोरोनाबाधित एकूण ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २३४ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२.७२ टक्के आहे.

पुणे विभागामध्ये एकुण १ लाख १ हजार ६३३ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ९८ हजार २५७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ३ हजार ३७६ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ८५ हजार ६५८ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १२ हजार ४१८ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण २०४ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १२८, सातारा जिल्ह्यात १०, सोलापूर जिल्ह्यात ३२, सांगली जिल्ह्यात १९ तर कोल्हापूर  जिल्ह्यात १५ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा