बारामती, ७ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरातील तांदूळवाडी भागात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाळासो जाधव (पूर्ण नाव नाही, रा.लोणी भापकर, ता.बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडीत गावात ही घटना घडली. तक्रारदार महिला या कामावरून घरी जेवण करण्यासाठी घरी आली असताना आरोपी जाधव हा तोंड ओळख असलेला व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या घरी आला. त्याने महिलेला घरी कोण आहे, तुमचे पती कोठे आहेत, ते कधी भेटतील अशी विचारणा करत त्यांचा हात धरला. व तक्रारदार महिलेला मिठी मारत लज्जा उत्पन्न होईल तिथे हात लावला.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बाळासो जाधव याने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव