टेंभुर्णीमधे लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर केला अत्याचार

6

माढा दि.३० ऑक्टोबर २०२० :टेंभुर्णी मध्ये लग्नाचे अमिष दाखवून ढाबा चालकाने महिलेवर गेली वर्षभर केला अत्याचार याप्रकरणी आरोपी सचिन शेळके विरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून.

याबाबत पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की आरोपी सचिन शेळके ढाबा चालवत असून पिडीत महिला हि याच ढाब्यावर काम करत असे याच संधीचा व पिडीत महिलेच्या असाहाय्यतेचा सचिन शेळकेने फायदा घेतला व लग्नाचे अमिष दाखवले.

अशी तक्रार पिडीत महिलेने टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधे दाखल केली आहे. आरोपी सचिन शेळके विरुद्ध भारतीय दंड ३७६,३२३ नुसार व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा