दिल्ली, २५ ऑक्टोंबर २०२३ : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात आज म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी २ वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी १.३० वाजता होईल.
या दोन्ही संघांनी चालू हंगामात आतापर्यंत ४-४ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने २ तर नेदरलँड्सने १ सामना जिंकला आहे. येथे, खराब सुरुवातीनंतर, ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले आणि सलग २ सामने जिंकले. त्याचवेळी धर्मशाला येथे झालेल्या विश्वचषकात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मोठे आव्हान निर्माण केले आहे.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने दोन्ही जिंकले. हे सामने २००३ आणि २००७ च्या विश्वचषकात खेळले गेले होते, याशिवाय या दोघांमध्ये एकही सामना झालेला नाही.
ऑस्ट्रेलिया संघ – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट.
नेदरलँड्स संघ – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फीकर, रायन क्लेन, शरीझ अहमद, वेस्ली बॅरेसी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड