कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वनाथन आनंद अडकले जर्मनीत

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण जग कोरोनामुळे भीतीच्या सावटाखाली आहे. अशी स्थिती सध्या आहे.
त्यातच बुध्दिबळ खेळाचा राजा असलेले विश्वनाथन आनंद कोरोनामुळे जर्मनीत अडकले आहेत. ते बुद्धिबळ स्पर्धेसाठी ते जर्मनीत गेले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचा तेथील मुक्काम वाढला आहे. आज ते भारतात येणार होते. मात्र मार्चअखेरपर्यंत त्यांना भारतात येता येणार नाही.
५० वर्षीय आनंद फेब्रुवारीत जर्मनीला गेले होते, ते आता जर्मनीत सर्वांपासून बाजूला राहत आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांशी मित्रांशी संवाद साधला आहे.
विश्वनाथन आनंद म्हणाले, माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे. दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत त्यांचा मुक्काम वाढला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा