देशात काल दिवसभरात ४०,७९१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर २०२० : देशात काल दिवसभरात ४०,७९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८२ लाख ९० हजार ३७० झाली आहे. याबरोबच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९३.४२ शतांश टक्क्यावर पोहचला आहे.

देशात काल २९,१६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८८ लाख ७४ हजारापेक्षा जास्त झाली आहे. काल देशभरात ४४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या, १ लाख ३० हजार ५१९ झाली आहे.

देशातला कोरोना मृत्यूदर सध्या १.४७ शतांश टक्के इतका आहे. सध्या देशभरात, ४ लाख ५३ हजार ४०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान देशभरात आत्तापर्यंत एकूण १२ कोटी ६५ लाख ४२ हजार ९०७ कोरोना चाचण्या झाल्या आहेत अशी माहिती, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा