अखेर चेन्नई सुपर किंग्स संघाला मिळाला विजय

दुबई १४ ऑक्टोबर,२०२०: काल झालेल्या आयपीएल २०२० मधील २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने सनरायजर्स हैदराबाद संघाला २० धावांनी पराभूत केले आहे. सी.एस.के संघाच्या चाहत्यांना या विजयानंतर दिलासा मिळाला असेल. तसेच या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी ठरला रवींद्र जडेजा. जडेजा ने फलंदाजी करतांना ताबडतोब १० चेंडूत २५ ठोकल्या. तसेच गोलंदाजी करतांना ३ षटकात २१ धावा देत एक विकेट ही आपल्या नावे केला.

सामन्यात, चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी ऑल राऊंडर समकरण हा ओपनिंग करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने ताबडतोड २१ चेंडूत ३१ धावा केल्या. तसेच शेन वॉटसन याने ३८ चेंडूत ४२ आणि अम्बती रायुडू याने ३४ चेंडूत ४१ धावा केल्या.तसेच कर्णधार एम.एस.धोनी याने १३ चेंडूत २१ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करतांना संदीप शर्मा ,खलील अहमद आणि टी.नटराजन यांना प्रत्येकी २,२ विकेट्स मिळाल्या. २० षटक अखेर चेन्नई सुपर किंग्स संघाने ६ बाद १६७ धावा केल्या.

१६८ धावांचा पाठलाग करताना,सनरायजर्स हैदराबाद संघाचे सलामीच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली नाही. डेव्हिड वॉर्नर अवघ्या ९ धावा तर बेरस्टो २३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर एकहाती झुंज देत केन विल्यम्सन याने अर्धशतकिय खेळी करत ३९ चेंडूत ५७ धावा केल्या. परंतु त्याला इतर कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. प्रियम गर्ग याने १६, विजय शंकर याने १२ तर रशीद खान याने १४ धावा केल्या. चेन्नई संघाकडून गोलंदाजी करतांना कर्ण शर्मा आणि ब्रावो यांना प्रत्येकी २,२ विकेट्स मिळाल्या. तसेच रवींद्र जडेजा , सम करण आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या. २० षटक अखेर सनरायजर्स हैदराबाद फक्त ८ बाद १४७ धावा करू शकले. आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा