केरळ निवडणुकीत राज्यातील ३१ एसआरपीएफ जवानांना कोरण्याची लागण, बंदोबस्तासाठी होते तैनात

दौंड, १४ एप्रिल २०२१: मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात कोरोना ची दुसरी लाट आलेली पहायला मिळतेय. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार निर्बंध लादून यावर नियंत्रण मिळवण्याचे कार्य करत आहे. राज्यात तर आजपासून संचारबंदी देखील लागू झाली आहे. एकीकडे कोरोना मुळे उद्भवलेली गंभीर स्थितीला देश सामोरे जात असताना दुसरीकडे बंगाल सह इतर चार राज्यात निवडणूका सुरू आहेत. या निवडणुका दरम्यान भाजप सह इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सभा देखील घेतल्या.
निवडणुकांदरम्यान आणि प्रचारादरम्यान होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस तसेच एसआरपीएफ जवानांची तैनात करण्यात आली होती. मात्र, या प्रचार सभांचा आणि निवडणुकीचा फटका आता महाराष्ट्रातील एसआरपीएफ जवानांना बसलाय. राज्यात पुणे जिल्ह्यातील दौंड मधील ३१ एसआरपीएफ जवानांना कोरोना ची लागण झालीय. हे जवान केरळमध्ये निवडणुकीदरम्यान तैनात करण्यात आले होते.
दौंडच्या एसआरपीएफ गट क्रमांक सातमधील जवान हे नुकतेच केरळच्या निवडणूक बंदोबस्ताच्या ड्युटीहून परतले होते. पण, घरी आल्यानंतर तीन-चार दिवसांनी या जवानांना अंगदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळं या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा यापैकी ३१ जवान चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व ३१ जवानांवर सध्या दौंडमधील गट क्रमांक सात मध्ये उपचार सुरू आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा