बॉम्बच्या अफवेने मुंबई विमानतळावर खळबळ

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी विमानतळ आणि परिसरात सुरक्षा वाढवली. बॉम्बशोधक पथकाला झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळून आले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विमानतळ अधिकाऱ्यांना शनिवारी संध्याकाळी ६ वाजता निनावी फोन आला होता. विमानतळावर निळ्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगून बनावट कॉल करण्यात आला. फोन करणाऱ्याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, विमानतळ कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष आणि विमानतळ सुरक्षा व्यवस्थापक यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथक विमानतळावर पोहोचले. विमानतळ परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले. पण काहीही संशयास्पद आढळले नाही, सध्या पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा