शेवटच्या षटकात फिरला सामना, राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय

यूएई, 22 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगामाचा 32 वा सामना दुबईत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला.  हा सामना राजस्थान रॉयल्सच्या नावावर होता.  त्यांनी पंजाब किंग्जचा 2 धावांनी पराभव केला.  राजस्थानने पंजाबला 186 धावांचं लक्ष्य दिलं होतं.  केएल राहुलचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून 183 धावा करू शकला.
 पंजाबला शेवटच्या षटकात फक्त 4 धावा करायच्या होत्या, पण केएल राहुलचा संघ फक्त 1 धावा करू शकला.  त्याने या षटकात दोन विकेट्स देखील गमावल्या आणि अखेरीस हा सामना 2 धावांनी गमावला.
 राजस्थानच्या विजयाचा नायक होता कार्तिक त्यागी, ज्याने शेवटच्या षटकात अवघ्या 1 धावात दोन बळी घेतले.  शेवटच्या षटकात कार्तिक त्यागीने निकोलस पूरन आणि दीपक हुड्डाला बाद केलं आणि शेवटच्या चेंडूवर त्याने फॅबियन एलनचा चेंडू डॉट करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
 या विजयासह राजस्थान रॉयल्सचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत.  संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.  त्याचबरोबर 9 सामन्यांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा सहावा पराभव आहे.
 पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
 केएल राहुलने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.  एविन लुईस आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला झटपट सुरुवात केली.  दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावा जोडल्या पण अर्शदीप सिंगने ही जोडी फोडली.
 त्याने प्रथम एविन लुईसला बाद केलं आणि त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फक्त 4 धावा करून इशान पोरेलचा बळी ठरला.  यशस्वी जयस्वाल आणि लिव्हिंगस्टोनने राजस्थानला 100 च्या पुढं नेलं.  लिव्हिंगस्टोन अत्यंत धोकादायक दिसत होता पण त्याला अर्शदीप सिंगने 25 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केलं.
यानंतर महिपाल लोमरोरने येताच पंजाब किंग्जला वेगवान फटकेबाजी करून अडचणीत टाकलं.  महिपाल लोमरोरने दीपक हुड्डाच्या त्याच षटकात 24 धावा केल्या.  दरम्यान, यशस्वि जयस्वालने पंजाबचा फिरकीपटू आदिल रशीदवरही हात साफ केला.  मात्र, राजस्थानच्या या फलंदाजानं आपलं अर्धशतक केवळ 1 धावांनी गमावलं. जयस्वालला हरप्रीत ब्रारने बाद केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा