गेल्या दोन महिन्यांत देशभरात जाणवले २९४ भूकंपाचे धक्के, राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेची माहिती

13

नवी दिल्ली १७ जून २०२३: देशातील अनेक राज्यांमध्ये, गेल्या काही महिन्यांत अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने येणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय. विशेष म्हणजे याच आठवड्यात राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये, ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. हिमाचल क्षेत्र हे भूकंपाच्या अनुषंगाने संवेदनशील आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये भारत तसेच शेजारी देशांमध्ये २९४ भूकंपाचे धक्के जाणवल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेचे ‘भूकंप देखरेख केंद्र’ देशभरात १५२ ठिकाणी असुन त्यांच्या माहितीनुसार, एप्रिल आणि मे महिन्यात या भूकंपाची नोंद घेण्यात आली. यातील ९० टक्क्यांहून अधिक भूकंपाचे धक्के उत्तराखंड सह हिमाचल तसेच हिंदकुश क्षेत्रात जाणवले. एनसीएसच्या अहवालानुसार हिमालयीन क्षेत्रातच बहुतांश भूकंप होत आहेत. एप्रिल महिन्यात या भागात १४४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.

यातील १३० भूकंप हे भारत तसेच देशाच्या सीमेलगत असलेल्या देशात आले. काही छोटे भूकंप महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश मध्ये जाणवले. एप्रिलमध्ये तीन रिक्टर स्केलहून कमी तीव्रता असलेले तीस, पाच रीक्टर स्केलहून अधिक तीव्रता असलेल्या पाच भूकंपाची नोंद घेण्यात आलीय, अशी माहिती भूकंपशास्त्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर