राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघामध्ये मा. अनिकेत बांदल यांची पुणे शहर सचिवपदी निवड

3

पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२०: भारत सरकारच्या विधान अंतर्गत संचलित राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाची पदनियुक्ती नुकतीच पार पडली. त्यामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघात मा.अनिकेत बांदल यांची पुणे शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच तानाजी लोहकरे यांची वेल्हे तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मा. अनिकेत बांदल यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. संदीपजी लोंढे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव- मा. सचिनजी लोंढे ,महाराष्ट्र प्रदेश सचिव- मा. रविजी पवार, पश्चिम महाराष्ट्र सचिव- मा. अनिलजी पारवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष- मा. योगेशजी पोरेडी, पुणे जिल्हा सचिव- मा. सुनिलजी तोडकर, मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. अनिकेत बांदल यांचे संघात हार्दिक स्वागत व पुढील सामाजिक कार्याकरता शुभेच्छा देण्यात आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा