गोल पोस्ट इतर राजकारण नवीन वर्षात, नवे घोटाळे बाहेर काढणार : किरीट सोमय्या यांचे ट्विट

नवीन वर्षात, नवे घोटाळे बाहेर काढणार : किरीट सोमय्या यांचे ट्विट

मुंबई, ३१ डिसेंबर २०२२ : नवीन वर्ष म्हटले की नव्या वर्षी अनेक लोक नवनवे संकल्प करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याचपार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत नव्या वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी पाच नेत्यांची नावे देखील जाहीर केली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण, यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

पुढे ते म्हणतात की, नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील, असे देखील सोमय्या यांनी जाहीर केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version