राज्यात काल ३००१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२० : राज्यात काल ३००१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९२.४९ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले एकूण १६ लाख १८ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात काल २ हजार ५३५ नव्या कोरोनाबाधितांचीही नोंद झाली. यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ४९ हजार ७७७ झाली आहे. काल राज्यभरात ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे राज्यातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४६ हजार ३४ झाली आहे. सध्या राज्यातला कोरोना मृत्यूदर २.६३ शतांश टक्क्यावर स्थिर आहे.सध्या राज्यभरात ८४ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नांदेड जिल्ह्यात आज नव्याने २२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. जिल्ह्यात आता एकूण बाधीतांची संख्या १९ हजार ६६२ झाली आहे. कोरोनाविषाणू संसर्ग बाधेमुळे आज एक रूग्ण मृत्यू पावला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५४१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या १६ रूग्णांना आज घरी सोडण्यात आलं. आजपर्यंत एकूण १८,७०१ रुग्ण बरे झाले आहेत तर ३२७ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभरात ९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६,९१२ झाली आहे. काल १० जणांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. एकूण आजपर्यंत जिल्ह्यात ६,५०८ रुग्ण बरे झाले आहेत. परभणी जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण २७८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७६ रुग्णांवर उपचार सूरु आहेत.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ४०,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १० नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यात पालघर ग्रामीण भागातल्या ७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हिड-१९ च्या रुग्णाची आतापर्यंतची एकूण संख्या ही ४१,८८८ वर पोहचली आहे.

त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या २७,३८६ इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या १४,५०२ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,१२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात काल ६५ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले, तर ३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आजवर सातारा जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४८,९५७ असून त्यापैकी ४४,७४३ बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १,६४६ मृत्यू झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,५६८ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा