राज्यात दिवसभरात ३४९ जणांचा मृत्यू, तर ६१ हजार ६९५ नवे रुग्ण

मुंबई, १६ एप्रिल २०२१: राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कलम १४४ लागू करण्यात आला असून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. राज्यात काल दिवसभरात तब्बल ३४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ५३ हजार ३३५ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ६ लाख २० हजार ६० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील २९ लाख ५९ हजार ५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा ५९ हजार १५३ वर जाऊन पोहोचला आहे.

देशात कोरोनाचा कहर !

तर दुसरीकडे भारतात कोरोना रुग्णांची संख्या पाहता तब्बल १३ कोटींच्या पुढे गेली आहे. भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे २ लाख नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच, सुमारे १ हजार ३८ जणांनी आपला प्राण गमावला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १,४०,७४,५६४ पर्यंत गाठली आहे. तर कोरोना मृत्यूची संख्या १ लाख ७३ हजारापर्यंत आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी १५ एप्रिलला दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा