वेल्हे : राज्यात आतापर्यंत ८९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तसेच वेल्हा तालुक्यातील एक महिला पॉझिटिव्ह आल्याने आख्खं गाव क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शिवाय खबरदारी म्हणून आजूबाजूची तब्बल २६ गावंही क्वारंटाईन करण्यात आली.
वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील एका ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे पानशेत परिसरातील २६ गावांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या गावामध्ये येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रातंधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
पानशेत परिसरातील साईव, गोरडवाडी, वडाळवाडी, आदी गावांना क्वारंटाईन करण्यात आले आले. या परिसरातील गावामध्ये चेक पोस्ट तयार केले आहे.
इथे सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. तर या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.