कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा करणार कार्यक्रमाचे आयोजन

18
पुणे, २१ मार्च २०२१: सध्या राज्यात कोरोना चा उद्रेक पुन्हा एकदा होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग राज्यात २५ हजारांपेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान शासनाने कोरोना बाबत नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे. प्रशासनाने सर्व राजकीय व सामाजिक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे, शासनाने दिलेल्या नवीन आदेशांची अंमलबजावणी करत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने २७ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या आपल्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभाचा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे ठरविले आहे.
कंपनी येत्या २७ मार्च २०२१ तारखेला आपल्या अनेक प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहे. यानिमित्ताने ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’आणि ‘ओमा फाउंडेशन’ यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील अनेक शाळा, संस्था, गरजू शेतकरी, रुग्णालय यांसारख्या अनेक ठिकाणी कंपनीकडून अनेक उपयोगी तसेच अत्यावश्यक साधनांचे वाटप करणार आहे. मात्र, , शासनाकडून कुठल्या हि कार्यक्रमात २० जणांन पेक्षा अधिक लोक एकत्र न येण्याचे आदेश दिले असल्यामुळे आता या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने करण्याचे ठरवले आहे. यावेळी संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जाईल तर मोजकेच व्यक्ती आणि कंपनीतील अधिकारी कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहतील.
गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप
कंपनी राज्यातील विविध भागातील निवडक गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप करणार आहे. विशेष म्हणजे कंपनी रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत आहे. भारत सरकार रिन्युएबल एनर्जी वर लक्ष केंद्रित करत आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी राज्यातील २५ शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप कंपनीकडून करण्यात येणार आहे.
१०  शाळांमध्ये ई-लर्निंग साधनांचे वाटप 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने राज्यातील सर्व शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे या कारणामुळे मोठे नुकसान झाले आहे. याला पर्याय म्हणून सरकारने ई-लर्निंग मार्फत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे लक्षात घेत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ १०  शाळांमध्ये ई-लर्निंग साधनांचे वाटप करणार आहे.
समाजीक कार्य करणाऱ्या संस्थानला रुग्णवाहिकेचे वाटप
कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रात बसला आहे. राज्यात पुन्हा एकदा वैद्यकीय सेवांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळात रुग्णवाहिकांचा मोठा तुटवडा जाणवला होता. हे लक्षात घेत कंपनीने पाच रुग्णालयांमध्ये मोफत रुग्णवाहिका दिल्या आहेत.
नवीन उद्योजकांना आर्थिक सहाय्य
कोरोना काळात अनेक उद्योग धंदे ठप्प झाले तर जे उद्योग नव्याने उदयास येणार होते त्यांची स्वप्न देखील भंगली. या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोहीम ‘स्टार्ट अप इंडिया’ देखील मंदावताना दिसली. नवीन उद्योजकांचे स्वप्न साकारण्यास आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ने हातभार लावण्याचे ठरविले आहे, अशा अनेक नवीन उद्योग धंद्यांना कंपनी आर्थिक सहाय्य पुरवणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे