घरात गॅस गिझर वापरताय …मग काळजी घ्या…

आपल्या घरामध्ये गिझर वापरतो. आणि जवळपास आता सर्वच घरांमध्ये गिझर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आंघोळीसाठी गरम पाणी मिळते.
त्यामुळे गरम पाण्यासाठी जर तुम्ही गॅस गिझर वापरत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

■ जर आपल्या घरात गॅस गळती होत आहे का यावर लक्ष ठेवा. गॅस गिझरमध्ये असलेल्या नैसर्गिक वायूचा सडलेल्या अंड्यासारखा वास येतो. याप्रकारचा वास येत असेल तर तत्काळ मदत घ्या.

■ शिवाय गॅस गिझर जर बिघडलेला असेल तर नैसर्गिक वायूचं ज्वलन अर्धवट होतं. परिणामी कार्बन मोनोक्साईड हा विषारी वायू तयार होतो.

■ बंद जागेत गॅस गिझर लावू नका. महानगर आणि इतर अधिकृत गॅस गिझर विक्रेतेपण गॅस गिझर बाथरूममध्ये लावायला मनाई करतात. त्यांच्या मते तो मोकळ्या जागेत लावायला हवा, जेणे करून तयार कार्बन मोनोक्साईड वातावरणात मिसळून जाईल.

■ गिझर जिथे आहे त्या जागी एक्झॉस्ट फॅन लावा. एक्झॉस्ट फॅनमुळे कार्बन मोनोक्साईड उत्सर्जित झालाच तर तो बाहेर फेकला जाईल.

■ वायू गळतीला वेगवेगळी करणं असू शकतात. काहीवेळा तुम्हाला पत्ताही लागत नाही. म्हणून नियमितपणे गॅस गिझर तपासून घ्या.

■ गॅस गिझरचा सतत वापर करू नका. थोड्या थोड्या वेळासाठी गिझर बंद करून मग पुन्हा वापर करा. सततच्या वापरामुळे गिझर बिघडून स्फोटही होऊ शकतो.
जर तुमच्या घरात गॅस गिझर असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात होणारी मोठी हानी टाळता येऊ शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा