राज्यपालांच्या हस्तें शुक्रवारी आरोग्य विधापीठाचे विभागीय केंद्र लॅबचा प्रारंभ

8

नाशिक, ३१ मे २०२३: महाराष्ट्र आरोग्य विधापीठाचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय केंद्र आणि पुणे येथील जीनहेल्थ लॅब ओपीडी प्रारंभ तसेच संगम २०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी २ जून रोजी होणार आहे. आरोग्य विधापीठाचा हा ऑनलाइन सोहळा पवई येथील आयआयटी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, आय आयटी पवईचे संचालक सुभाशिष चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदनगर परिसरात सुमारे १५ हजार चौरस फूटांत विधापीठाचे नवीन विभागीय केंद्र बांधले आहे.

या केंद्रामार्फत डिप्लोमा इन ऑप्थाल्मिक सायन्स, ऑप्टोमेट्री हा पदविका अभ्यासक्रम व बी.एस्सी, ऑप्टोमेट्री हा पदवी अभ्यासक्रम शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आरोग्य विधापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ मॅनेजमेंट इन पोस्ट कोविड-१९ वर्ड संकल्पनेवर संगम-२०२३ आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कानिटकर यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर