‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून वृत्त वाहिनी, मनोरंजन वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म चे उद्घाटन

पुणे, २८ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून काल विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. काल २७ मार्च रोजी कंपनी आपला हा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात करणार होती. मात्र, कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता कंपनीने सरकारच्या नवीन गाईडलाईन्स नुसार मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपला हा उद्घाटन समारंभ पार पाडला. कंपनी रिन्यूएबल एनर्जी सेक्टर, इंटरटेनमेंट, मिडीया, हॉस्पिटॅलिटी, मेटल सेक्टर यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. ज्यातील काही प्रकल्पांचे आज उद्घाटन करण्यात आले. या आपल्या विविध प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे.
आपल्या विविध प्रकल्पां बरोबरच कंपनीने मनोरंजन क्षेत्रातील आपल्या इतर प्रकल्पांचे देखील उद्घाटन या वेळी केले. ज्यामध्ये ‘सॉल्ट पिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म, ‘स्वरंग’ मराठी मनोरंजन वाहिनी आणि या मनोरंजन क्षेत्रा व्यतिरिक्त मराठी वृत्तवाहिनी ‘न्यूज अनकट’ यांचा समावेश आहे. हे तिन्ही माध्यमे प्रेक्षकांच्या भेटीस १ मे रोजी येणार आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्म बाबत बोलायचे झाले तर, लॉक डाऊन च्या काळात सर्व सिनेमागृहे बंद राहिली होती. अशा परिस्थितीत प्रेक्षकांचा कल सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म कडे गेला होता. केवळ वेब सिरीजच नाही तर विविध चित्रपटांचे प्रदर्शन देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आले होते. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म ला एक वेगळीच मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. हे लक्षात घेता ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने ‘सॉल्ट पिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या माध्यमातून विविध कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. सध्या हे ओटीटी ॲप सामान्य जनतेसाठी उपलब्ध झालेले नाही, परंतु १ मे पासून प्रेक्षकांसाठी हे ॲप उपलब्ध होणार आहे.
या बरोबरच कंपनीने ‘स्वरंग’ मराठी मनोरंजन व माहिती वाहिनी आणि या मनोरंजन क्षेत्रा व्यतिरिक्त मराठी वृत्तवाहिनी ‘न्यूज अनकट’ देखील सुरू केले आहे. स्वरंग वाहिनी मार्फत विविध सिरियल्स, इंटरटेनमेंट प्रोग्राम्स, खाद्य, पर्यटन, संगीत, नृत्य या सर्व मनोरंजन प्रकारांचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. तसेच न्यूज अनकट ही एक मराठी वृत्त वाहिनी आहे. या मार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय, सामाजिक, अर्थ, क्रीडा, मनोरंजन यांच्याशी संबंधित ताज्या घडामोडी प्रेक्षकांना मिळणार आहेत.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सदस्य श्री. जोश्वा, श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा